Alexander the great
Alexander and bucepalus
खूपदा मला वाटायचं लहानपणापासून अलेक्झांडरला जगज्जेता व्हावं असं का सुचलं असेल? त्या छोट्या वयात मनामध्ये कशाप्रकारचे वादळ सिकंदर च्या मनात असेल?
तर नक्कीच याला काही गोष्टी जबाबदार होत्या. एक म्हणजे त्याच्या आईची असलेली महत्वाकांक्षा आणि त्याच्या गुरूचे मार्गदर्शन. असच एकदा गोलाकार रिंगण मध्ये कित्येक मातब्बर सरदार एका उमद्या पण वयाने कमी असलेल्या काळया रंगाच्या घोड्यावर पकड मिळवायचा प्रयत्न करत होते.पण अपयश. दुसरं काहीही नाही. मग राजा फिलिप ने सुद्धा प्रयत्न केला आणि त्यांना पण ते जमलं नाही. नकारात्मक पवित्रा घेत त्या घोड्याने सर्वांनाच लांब केलं. पण तितक्यात त्या रिंगणात एका छोट्या मुलाने प्रवेश केला. त्या मुलाने त्या बलाढ्य घोड्याची मानसिकता ओळखली. आणि पुढच्याच क्षणी त्याने त्याच्याशी बोलायला सुरवात केली. त्या मुलाने घोड्याला स्वतःच्या सावलीत बघायला सांगितलं आणि लगाम खेचून घोड्यावर बसला आणि त्याचा ताबा घेतला. त्या मुलाची चहूबाजूला वाहवा झाली. त्या मुलाचं नाव अलेक्झांडर होते आणि तो घोडा म्हणजे Bucephalus.
अतिशय चपळ, बुध्दीमान आणि वाऱ्यापेक्षा वेगवान गती ही काही Bucephalus ची वैशिष्ट्ये. या गोष्टींमुळे स्वतः राजा अलेक्झांडर बाकी सैन्याच्या पुढे काही अंतर राहायचा. अलेक्झांडर युध्दात पहिल्या रेषेत लढत असल्याने उपरोक्त ग्रीक सैनिकांचा आत्मविश्वास आणि उत्साह परमोच्च असायचा.
Bucephalus ने अलेक्झांडर ला खूप साथ दिली. जग जिंकण्याची इच्छेने पूर्वेकडे येताना वेगवेगळ्या भागात निराळीच आव्हान समोर असायचं. कधी निबीड अरण्य, पाऊस , तर कधी जीवघेणी थंडी.
भारतात येण्याआधी वायव्य प्रांतात एका राजाने अलेक्झांडरला आव्हान दिलं. तेव्हाची भारतीयांची युद्धाची पद्धत म्हणजे गनिमी कावा त्यातही खासकरून वायव्य खिंडी मध्ये लपून शत्रूवर तुटून पडायचे आणि काही फरकाने शत्रूला नामोहरम करायचं असं नियोजन असायचं.
आता यामध्येही एक खास गोष्ट होती ती म्हणजे हत्ती बळाचा प्रभावी वापर . पोरू राजानी ग्रीक सैन्यासमोर हत्ती ची फौज नेल्यावर ग्रीक घोड्यांनी पिछेहाट केली आणि पोरू राजाचं पारडं जड झालं आणि अलेक्झांडर हे युद्ध हरणार अशी परिस्थीती तयार झाली. पण पुढच्याच क्षणी अलेक्झांडर ने Bucephalus शी बोलायला सुरुवात केली आणि त्याला सरळ राजा पोरू समोर नेऊन उभे केलं. त्यामुळं परत एकदा ग्रीक सैन्यात शक्ती संचारली आणि राजा पोरु ने माघार घेतली.
या युध्दात अलेक्झांडर पोरू राजाच्या पराक्रमवर खूप खुश झाला आणि त्यांचं राज्य परत दिलं. पण या युध्दात स्वतः अलेक्झांडर आणि Bucephalus अतिशय जखमी झाले. शेवटी Bucephalus नाही वाचू शकला. परतीच्या वाटेत त्या इतिहासामधल्या श्रेष्ठ घोड्याचं स्मारक तयार करायला अलेक्झांडर अजिबात विसरला नाही.
Comments
Post a Comment